आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा गुजरातच्या टॉरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी कर्जत तालुक्यात हजारो झाडे तोडण्याबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. Karjat Bhimashankar Felling of Trees: विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची राख करून कर्जत भीमाशंकरमधील तब्बल 3 लाखांवर झाडे तोडल्याचा आरोप होत आहे. आतापर्यंत हजारोच्या भल्यामोठ्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. गुजराती टॉरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पाला पक्षपातीपणा दाखवल्याचा आरोप महायुती सरकारवर होत आहे.