Bhaskar Jadhav: जरांगे यांचं काम आणि टीका करणाऱ्यांची कुवत आणि त्यांच्यावर झालेले संस्कार संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) आणि ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ उठले आहे.