नांदेड जिल्ह्यातील माळकौठा येथे फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेले नागेश कोंकवाड आणि दत्ता गायकवाड हे दोन शेतकरी बेपत्ता झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी बेपत्ता शेतकऱ्यांपैकी नागेश कोंकवाड यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती घेतली आहे. नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेडमधील माळकौठा येथे फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेले दोन शेतकरी बेपत्ता झाले आहेत. गावकऱ्यांनी या घटनेमागे फायनान्स कंपनीचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.