घटस्फोटाच्या काळात डिंपीने राहुल महाजनवर घरगुती हिंसाचार आणि मारहाणीचे आरोप केले होते. या आरोपांमुळे त्यांचं वैवाहिक आयुष्य चर्चेचा विषय ठरलं. घटस्फोटानंतर डिंपी मानसिकदृष्ट्या कठीण परिस्थितीतून जात होती. टेलिव्हिजनवरील एका रिअॅलिटी शोमधून लग्न करून चर्चेत आलेली अभिनेत्री डिंपी गांगुली आज मनोरंजनविश्वापासून दूर आनंदी कौटुंबिक आयुष्य जगत आहे. एकेकाळी राहुल महाजनसोबतच्या लग्नामुळे चर्चेत असलेली डिंपी आता दुबईमध्ये स्थायिक झाली आहे.