कमळी आणि अन्नपूर्णा आजींच्या या खास भेटीचाक्षण प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे. काही नाती अशी असतात, जी काळाच्या ओघात आणि परिस्थितीमुळे दुरावतात पण त्यांच्यातील प्रेमाची ओढ कायम असते. अनेक वर्षांपासून हरवलेल्या आपल्या माणसाची वाट पाहणाऱ्या कुटुंबासाठी त्या व्यक्तीची भेट म्हणजे आनंदाचा आणि भावनांचा अनमोल क्षण असतो. झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेतही आता असाच एक भावनिक आणि महत्त्वाचा टप्पा येणार आहे.