तुकाराम मुंढे यांनी दिवाळीआधीच मोठी कारवाई केली आहे. मुंढे यांच्या विभागाने नाशिकमध्ये निकृष्ट दर्जाचा तेलसाठा जप्त केलाय. तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका सुरुच आहे. नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. सातपूर येथील पंकज ऑईल मिलवर धडक कारवाई करण्यात आली आहे. विभागाने 3 हजार 210 किलो निकृष्ट दर्जाचा तेलसाठा जप्त केला आहे. रिफाइंड सोयाबीन ऑईलमध्ये भेसळ असल्याचा संशय व्यक्त केला आहे.