कराड : कराड शहरातील वाहतूक नियमन प्रभावीपणे राबविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करणे तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने नियमबाह्य उप. कराड : कराड शहरातील वाहतूक नियमन प्रभावीपणे राबविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करणे तसेच रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने नियमबाह्य उपकरणांचा वापर रोखण्यासाठी कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून आज दिवसभर विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ब्लॅक फिल्मिंग, मॉडिफाईड सायलेन्सर, प्रेशर हॉर्न व फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.