कोकरूड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात घरफोड्या आणि चोऱ्यांचे सत्र वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घरे, दुकाने, शेतातील पाण्याचे. बंद घरे, दुकाने, शेतातील पाण्याचे पंप आणि विद्युत तारा चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने ग्रामस्थांसह शेतकरीही त्रस्त झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे..