कोल्हापूर : कोल्हापुरात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झा. कोल्हापूर : कोल्हापुरात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. .या पावसामुळे दुचाकीस्वारांसह नागरिकांची तारांबळ उडाली. राजारामपुरी, रमणमळा, शाहूपुरी परिसरात झाडे कोसळली. तीन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाचा हलका शिडकावा होत आहे.