हत्या केल्यानंतरचे कपडे, हेल्मेट, आरोपीचा मोबाइल आणि कटाची माहिती घेण्यासाठी या दोन्ही आरोपींना वाढीव एक दिवसाच्या पोलिस काेठडीची मागणी ठाणे पोलिसांनी न्यायालयाकडे केली. मात्र, ही मागणी फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : उद्धवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली आणि अमित जयकिशन सिंग ऊर्फ पपलू यांना ठाणे न्यायालयाने शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.