बनावट व्यवहार नोंदी करून व निधी अंतर्गत खात्यांमधून वळवून हा अपहार केल्याचे बँकेच्या अंतर्गत चौकशीत निष्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बँकेतील अंतर्गत खात्यांमधील व्यवहारांचा गैरवापर करून तब्बल २० लाख ४९ हजार ८४० रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार बँक ऑफ इंडिया, प्रभादेवी शाखेत उघडकीस आला. याप्रकरणी बँकेतील तत्कालीन अधिकारी शुभ्रज्योती दास व सौम्य रंजन पाल यांच्याविरोधात दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.