निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांवर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मराठा विद्यार्थ्यांकडून ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारू नये, तसेच शुल्क भरले नसले तरी प्रवेशप्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण करू नये, असे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.