Mumbai Pollution: एरवी दिमाखात झळकणारे वांद्रे-वरळी सी लिंक आणि अटल सेतूही या धुरकट पडद्याआड गायब झाले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुंबईकरांचा श्वास रोखणारी ही स्थिती कायम होती. . मुंबई : वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली मुंबई शनिवारी अक्षरशः धुरक्यात हरवली. धूर, धुके आणि धुळीच्या चादरीमुळे शहराची दृश्यमानता ४०० ते ५०० मीटरपर्यंत खालावली. एरवी दिमाखात झळकणारे वांद्रे-वरळी सी लिंक आणि अटल सेतूही या धुरकट पडद्याआड गायब झाले होते.