Canara Bank fraud case: भारतातील प्रमुख पायाभूत सुविधा विकास आणि वित्तीय सेवा कंपनी असणाऱ्या आयएल अँड एफएस ग्रुपची ऊर्जा क्षेत्रातील ही उपकंपनी आहे. लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॅनरा बँकेच्या २१२.३४ कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) मुंबईस्थित 'आयएल अँड एफएस एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड' आणि कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह अन्य संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला.