आग लागल्यानंतर डब्यात धूर पसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. गांभीर्य ओळखून घाटकोपरजवळील एका प्रवाशाने जळती बॅग डब्याबाहेर फेकली. लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर ते बदलापूरदरम्यान धावणाऱ्या एसी लोकलच्या महिला डब्यात शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. महिला प्रवाशाच्या बॅगेत असलेल्या पॉवर बँकमध्ये बिघाड झाल्यामुळे दुर्घटना घडल्याचा संशय आहे.आग लागल्यानंतर डब्यात धूर पसरला. गांभीर्य ओळखून घाटकोपरजवळील एका प्रवाशाने जळती बॅग डब्याबाहेर फेकली.