१८ ऑक्टोबर रोजी टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासासाठी अनेक पथके तैनात केली आहेत. . लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात हरियाणातील सोनीपत येथील इंजिनियरला मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक करण्यात आली. प्रांजल ठाकरन असे या आरोपीचे नाव असून, हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या आरोपींना आवश्यक साधनसामग्री आणि इतर मदत पुरवल्याचा त्याच्यावर संशय आहे. आता या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या ११ झाली आहे.