निपाणी : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘गृहज्योती’ योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांच्या कागदपत्र पडताळणीची मोहीम निपाणी परिसरात अंतिम टप्प्यात आली आहे. हेस्कॉमच्. हेस्कॉमच्या निपाणी कार्यालयांतर्गत आतापर्यंत सुमारे ९९ टक्के ग्राहकांची पडताळणी पूर्ण झाली असून, अद्याप पडताळणी बाकी असलेल्या सुमारे हजारभर लाभार्थ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित ग्राहकांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते..राज्य सरकारने जुलै २०२३ मध्ये गृहज्योती योजना सुरू केली.