कोल्हापूर : ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून परिसरात बिबट्या वावरत असल्याचा बनावट फोटो तयार करून तो मोबाईलद्वारे प्रसारित करत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल. अशा प्रकारचे कृत्य पुन्हा केल्यास कठोर कारवाईचा इशाराही वन विभागाने दिला आहे. .१६ ऑक्टोबर २०२६ रोजी पाचगाव (ता. करवीर) येथे बिबट्या दिसल्याची खोटी बातमी मोबाईलवरून व्हायरल केली होती. याबाबत ग्रामपंचायत सदस्य सागर दळवी यांनी कळवल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन चौकशी केली.