नासधुस करायला आलेल्या माकडाने दुकानदाराला मारली थेट 'जादूची झप्पी'; सीसीटीव्ही व्हिडिओ तुफान व्हायरल. एकाला दिली प्रेमाची मिठी तर दुसऱ्याची उडाली घाबरगुंड. माकडाचा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद. माकड दुकानात शिरला कि वस्तूंची वाट लागलीच समजायची, पण एका माकडाने असा काही प्रताप केलाय कि नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच आहे.पण त्याशिवाय हसून हसून लोटपोटही व्हायला झालं आहे. मोबाईलच्या दुकानात शिरलेल्या त्या माकडाने दुकानदाराला थेट जादूची झप्पीचं दिली आहे.