Bengaluru Water Crisis: उन्हाळ्यात पाण्याचा थेंब महाग, पावसाळ्यात पाणीच पाणी असते. बेंगळुरूला एकाच वर्षात दोन आपत्तींचा फटका बसत आहे. बेंगळुरूमधील एका दुकानदाराने गेल्या उन्हाळ्यात पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या चालकासोबत एका टँकरच्या किमतीवरून घासाघीस केली होती. काही महिन्यांनंतर पावसाळ्यातील पुराचे पाणी तासाभराच्या आत त्याच्या दुकानाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले. त्याने नुकताच भरलेला माल पूर्णपणे खराब झाला. दोन परस्परविरोधी आपत्ती आणि दोन्ही पाण्याशीच संबंधित.. हे कदाचित विरोधाभासी वाटू शकेल, पण प्रत्यक्षात तसे नाही.