Congress District President Pankaj Guddewarगडचिरोली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंकज गुड्डेवार यांची काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आ. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी (दि.२४) दुपारी काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष अॅड.गणेश पाटील यांनी गुड्डेवार यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले..काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे हे त्यांच्या आश्रमशाळेत झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी सध्या कारागृहात आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेसने पंकज गुड्डेवार यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे..