यवतमाळ : वणी तालुक्यातील मानकी गावालगतच्या हनुमान मंदिर परिसरात गुप्तधन मिळविण्याच्या अंधश्रद्धेतून खड्डा खोदण्याचा प्रकार शुक्रवार दि. 23 ऑक्टोबर रोजी रात्री उ. 23 ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आला. ग्रामस्थांनी दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, तर अन्य पाच जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या प्रकरणी वणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध सुरू केला. .