FDA: अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006चा उद्देश अन्न नियमनाचे विकेंद्रीकरण करणे हा होता, असा दावा देखील एफडीएकडून याचिकेत करण्यात आला आहे. पुणे : एफडीएने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून रोखले जात असल्याचा आणि अधिकार हिरावून घेतले जात असल्याचा एफडीएने (FDA) दावा केला आहे.