एकल महिलांचा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत विवाह सोहळा संपन्न झाला असून चक्क मंत्री नरहरी झिरवळ यांनी मंगलाष्टिका गायली. नाशिक : लग्न (Marriage) ही प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदी क्षण असतो. शेकडो, हजारो हात या सोहळ्यावेळी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी येत असताता. मात्र, नाशिक (Nashik) शहरातील एका आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, येथील लग्नसोहळ्याचे आयोजनच जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या पुढाकाराने झाले होते.