Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असून, या रात्री देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी घरातील काही ठरावीक ठिकाणी दिवा लावणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया, धन लाभ आणि सुख-समृद्धीसाठी कोणत्या ५ ठिकाणी दिवा लावावा. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. अश्विन महिन्यातील या पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात आणि जागे असलेल्या भक्तांवर कृपा करतात, अशी धार्मिक मान्यता आहे.