कोण होणार करोडपतीमध्ये आलेल्या गौतमी पाटीलने जुना व्हायरल व्हिडीओ, माफी आणि त्या व्हिडीओवरून झालेली टीका यावर भाष्य केलं. त्यावर माधुरी दीक्षितने दिलेली प्रतिक्रिया देखील चर्चेत आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या हिंदी शोच्या धर्तीवर सुरू झालेल्या ‘कोण होणार करोडपती’ या मराठी क्विझ शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या शोचा 5 वा सीझन सुरू असून, बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित या शोचं सूत्रसंचालन करत आहे.