Thane Bhiwandi Metro Line 5ठाणे ते भिवंडीदरम्यानच्या मेट्रो मार्गिका क्रमांक ५ च्या कामाला आता महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. या मार्गिकेसाठी पहिली मेट्रो गाडी दाखल झाली असून, पुढील आठवड्यापासून चाचणी धावांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. या मार्गिकेवरील प्रवासी सेवा २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ठाणे आणि भिवंडीदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.