पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या देशांतर्गत हवाई मार्गांच्या जाळ्याचा मोठा विस्तार करत नऊ नव्या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली. पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या देशांतर्गत हवाई मार्गांच्या जाळ्याचा मोठा विस्तार करत नऊ नव्या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या विस्तारामुळे महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, आसाम, झारखंड, पश्चिम बंगाल आणि लक्षद्वीप या राज्यांतील प्रमुख शहरांशी मुंबई महानगर प्रदेश थेट जोडला जाणार आहे.