Nagpur Accident News : दसऱ्याच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून दोन वाहनांना धडक दिल्याच्या आरोपावरून आमदाराचा कथित खासगी सहायक (पीए) केतन हिवंज याला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. या अपघातात २८ वर्षीय डिलिव्हरी बॉय राहील शकील शेख गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.