Nagpur News : सिल्वासा येथे नायलॉन मांजा तयार करणाऱ्या अज्ञात कारखान्याचा पोलिसांनी शोध घेत सुमारे ६ कोटींचा माल जप्त केला. या तपासावर उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले असून, विदर्भातील उर्वरित दहा जिल्ह्यांतही अशीच कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केले. तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही अशाच पद्धतीने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.