सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत अन्नपदार्थांची मागणी वाढते. या काळात ग्राहकांना सुरक्षित. नाशिक : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. सोमेश्वर घरगुती मसाले’ या आस्थापनेवर छापा टाकून तब्बल २ हजार २३० किलो मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची एकूण बाजारभावानुसार किंमत ११ लाख ८६ हजार २०० रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली. सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.