समुद्रपूर : पावसाने पाठ फिरवल्याने समुद्रपूर तालुक्यातील खरीप पिके हातची गेली असून, जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी हंगामही संकटात सापडला आहे. सोयाबीन शेंगा भरण्याप. सोयाबीन शेंगा भरण्यापूर्वीच वाळले, तर कपाशीची वाढ खुंटून पाने आणि बोंडे गळू लागली आहेत. तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला असला, तरी प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतातील पिके वाळल्याचे विदारक चित्र दिसत आहे. सोयाबीनला दाणे न भरल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.