तासगाव : शहरात शाळांच्या आवारातून तसेच शहर परिसरातून विद्यार्थ्यांच्या सायकली चोरीला जाण्याचे प्रकार वाढत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आ. शिक्षणासाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सायकलीच सुरक्षित नसतील, तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येणार नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी तासगाव पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे..