Mumbai ATS Action: मुंबईत दहशतवादविरोधी पथकाने ATS ने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या संघटनेशी संबंधित एकाला माहिममधून उचललं आहे. त्याच्याकडे अनेक आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट आणि अजहर मसूदच्या ऑडिओ क्लिप आढळून आल्या. Mumbai ATS Action: मुंबईत दहशतवादविरोधी पथकाने माहिम परिसरात मोठी कारवाई केली. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याच्या आरोपावरून ३३ वर्षीय मोहम्मद हसन अबू सरमद अख्तरला अटक केली. आरोपी हा इत्र विक्री करत असल्याचे आणि बाईक रायडर असल्याची माहितीही समोर येत आहे.