रत्नागिरी : ग्रामीण भागातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची ११६ पदे रिक्त असताना जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्यांपैकी तब्बल १३५ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना कार्यमुक्त कर. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर नवीन अधिकारी हजर होईपर्यंत या अधिकाऱ्यांना न सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला..जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना थेट उपकेंद्राच्या पातळीवर वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी शासनाने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची ३५१ पदे मंजूर केली आहेत. मात्र, आजच्या घडीला यातील केवळ २३५ पदांवर आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत..