नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि दरवाढीचा दबाव कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या. टॅरिफ रेट कोटा (टीआरक्यू) योजनेंतर्गत १० लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला ही सवलत लागू राहणार आहे. यापूर्वी आयातीची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत होती. या निर्णयामुळे आयातीचा कोटा वाढलेला नसून साखर आयात करण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा अवधी मिळणार आहे..वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) आयात धोरणातील मुदतवाढ अधिसूचित केली आहे.