राजापूर : राजापूर तालुक्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, पाचल आणि खरवतेनंतर आता ओणी-कोंडिवळे येथील गोतावडेवाडीत घरफोडीची घटना घडली आहे. या चोरीत सोन्या-चांदीच्य. या चोरीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण १ लाख ८ हजार ७६५ रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. तालुक्यात वारंवार घडणाऱ्या घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे..ओणी-कोंडिवळे येथील गोतावडेवाडीतील शामसुंदर गजानन शेट्ये यांच्या राहत्या घरी २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ९.४५ या वेळेत ही चोरी झाली.