कुडाळ : सातबारा उताऱ्यावर नोंद घालण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच मागणारे पिंगुळी (ता. कुडाळ) येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) जितेंद्र काळू खेताडे (वय. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली असून, या घटनेमुळे महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ३५ वर्षे, व्यवसाय: वकील) यांनी आपल्या अशिलाच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी तलाठी सजा पिंगुळी कार्यालयात प्रकरण दाखल केले होते.