TV9 Marathi Impact: एका बातमीने महाराष्ट्रातील एका मुलीच्या भविष्याला नवी आशा मिळाली आहे. तिला जात वैधता प्रमाणपत्र मिळालं आहे. यामुळे लेकीच्या शिक्षणासाठी वडिलांचा संघर्ष फळाला लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर 58 लाख मराठा कुणबीच्या नोंदी आढळल्या. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा गावातील उमा ज्ञानेश्वर चव्हाण या विद्यार्थिनीची मराठा कुणबीची नोंद मिळाली. त्यानंतर तिच्या वडिलांना आवश्यक कागदपत्राच्या आधारे मराठा कुणबीचे जात प्रमाणपत्र मिळाले.