नाशिक : पुढारी वृत्तसेवाआर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना प्रलोभने दाखवून स्त्रीबीज मिळवण्याच्या कथित तस्करी प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी (दि. २. २२) नाशिकसह ठाणे आणि बारामती येथे छापेमारी केली. मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत रुग्णालये, आयव्हीएफ केंद्र आणि अन्य ठिकाणांसह एकूण १० ठिकाणी शोधमोहीम राबवली. या कारवाईत २९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. .Nashik Smart City | नाशिक स्मार्ट सिटीच्या 4.23 कोटींच्या अखर्चित निधीवरून केंद्र व राज्य शासनाचा जाब.