Manoj Jarange Audio Clip: एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्याची सुपारी जरांगे यांनी घेतली आहे, असा आरोपही त्यांनी केला. जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे हे डुप्लिकेट मराठा आहेत, अशी टीका करत शिवसेनेचे जालना उपजिल्हाप्रमुख धनंजय पोहेकर यांनी जरांगे यांच्या तोंडाला काळं फासणार असल्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांनी मोठा फटका फोडण्याची भाषा केली होती, मात्र त्यांनी फुसका फटाका टाकला, अशी टीका पोहेकर यांनी केली.