मुंबईच्या महापौर कार्यालयाला धमकीचा मेल आला आहे. त्यात बॉम्बस्फोटो कुठे करणार? किती तारखेला करणार? ते सर्व सांगितलं आहे. निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : मुंबईच्या महापौर कार्यालयाला धमकीचा मेल आला आहे. 31 ऑक्टोबर आणि 27 नोव्हेंबरला स्फोट घडवण्याची धमकी या ई-मेलमधून देण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरला शाळेवर ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. 27 नोव्हेंबरला महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेख आहे. ई-मेलमध्ये खलिस्तान आणि काही संघटनांच्या नावांचा उल्लेख आहे.