कडा : आष्टी तालुक्यातील देवळाली- लोखंडवाडी परिसरात वाघाच्या हल्ल्यात देविदास मारिपाक टकले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने टकले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी कुटुंबाला आधार देण्यासाठी आ. सुरेश धस यांनी पुढाकार घेतला असून,त्यांच्या प्रयत्नातून शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेली आणि वैयक्तिक स्वरूपातील अशी एकूण २५ लाख रुपयांची आर्थिक मदत टकले कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. .