शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी पंतप्रधान मोदी आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. मोदींचे पैसे आले म्हणून शेतकरी बँकेत धावत असल्याची टीका करत, हे पैसे शेतकऱ्यांचेच कष्ट आणि टॅक्सचे असल्याचे म्हेत्रे म्हणाले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज्यात एकीकडे दिवाळी साजरी होत असताना राजकीय घडामोडींना मात्र वेगेळेच वळण येत आहे, महत्त्वाची राजकीय बातमी समोर आली आहे.