मुंबई : दिवाळीच्या धामधुमीत मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पश्चिम भागातील. अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला येथील एका बहुमजली इमारतीत शनिवारी रात्री आग लागली. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लोखंडवाला ब्रिजजवळ असलेल्या रुणवाल टॉवरमध्ये ही आग लागल्याचे समजते. यामध्ये तळमजला, बेसमेंट, पोडियम आणि त्यावर अनेक मजले आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास इमारतीतील एका फ्लॅटमधून धूर निघताना दिसला. काही वेळातच आगीने मोठे रूप घेतले.