Mumbai Kamgar Stadium Fire: मुंबईतील दादर पश्चिमेकडील कामगार स्टेडियम परिसरात रविवारी सकाळी अचानक भीषण आग. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील प्रसिद्ध कामगार स्टेडियममध्ये रविवारी सकाळी अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे आणि धावपळीचे वातावरण निर्माण झाले होते.