मुख्यमंत्री आमच्या समस्या ऐकून यावर नक्कीच मार्ग काढतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नितीन नागपुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, लोहारी सावंगा (जि. नागपूर): 'मुख्यमंत्री आज आमच्याकडे येऊन राहिलेले आहेत, याचा एवढा अभिमान वाटत आहे की आपण केलेल्या श्रेयाचं पांडुरंगानं फळ दिलं... पण आमची व्यथा अशी आहे की सोयाबीन पेरलं, त्याला रोटर मारलं; कपाशीला पाणीच नाही, विहिरीत पाणीच उरलं नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी रात्री शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्कामी होते.