गोपाळ लावंड माळीनगर : माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, पाण्याअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतातील उभी पिके जळू लागल्याने शेतकऱ्. शेतातील उभी पिके जळू लागल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. लुमेवाडी बंधाऱ्यासह बिजवडी, तांबवे, ओझरे, गणेशगाव आणि संगम परिसरातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. त्यामुळे नीरा नदीमध्ये तातडीने पाण्याचा विसर्ग करून परिसरातील बंधारे भरून द्यावेत, अशी आक्रमक मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..