बंगळूर : जिल्हा पंचायत, तालुका पंचायत तसेच नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय मुख्यमंत्. मंत्र्यांच्या दोन जागा रिक्त असून, राज्यातील प्रभावशाली असलेल्या वाल्मीकी व पंचमसाली समाजांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. त्यासाठी माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि बी. नागेंद्र यांच्या नावांवर दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. बेळगावात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी दोन्ही जागा भरण्यात येणार आहेत.