कोल्हापूर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीचा उत्साह दुणावला असून रविवारपासून सुरू होणाऱ्या प्रकाशपर्वाच्या खरेदीसाठी कोल्हापूरकरांनी सहकुटुंब गर्दी केल्. गर्दीमुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने व शोरुम्स पहाटेपर्यंत सुरू होती. .नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने रविवारी घरोघरी आणि व्यापारी आस्थापनांमध्ये होणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या मंगल मुहूर्तावर संपूर्ण बाजारपेठेत मोठी उलाढाल होत आहे. महाद्वार रोड, गुजरी, राजारामपुरी, लक्ष्मी रोड, भवानी मंडप आणि शाहूपुरी, स्टेशन रोड परिसर गर्दीने फुलून गेले होते.